अश्विनीकुमार होंकण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Nice Guys Finish First Too! हसतमुख, चिरतरुण रवी पंडित यांना पाहिल्यावर हा माणूस केपीआयटी टेक्नॉलॉजीज या महाकाय (२०२२-२३ मध्ये रुपये ४३५ अब्जची उलाढाल) कंपनीचा सहसंस्थापक, चेअरमन आणि ‘केपी ग्रुप’ चा चेअरमन आहे आणि तेही गेल्या तीन दशकांहून जास्त काळ, यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. त्यामुळे एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा या परिचयात आपोआपच एकेरी उल्लेख केला गेला आहे.
त्याचं दुसरं कारण म्हणजे हा माणूस आपल्या मोठेपणाचे ओझे मुळीच अंगावर बाळगत नाही. वास्तविक चार्टर्ड अकौन्टन्सीसारख्या अतिशय अवघड परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेली आणि त्यानंतर एमआयटी विद्यापीठाच्या जगात अग्रगण्य स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलेली व्यक्ती म्हणजे अक्षरश: लाखात एक. अशा व्यक्तीने भारतात परत येणे जवळजवळ असंभवनीयच. पण पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलेला रवी पंडित १९७६ मध्ये भारतात परतला व त्याच्या वडिलांनी १९५६ मध्ये स्थापन केलेल्या ‘कीर्तने पंडित’ या छोटेखानी पण सचोटी आणि चोखपणासाठी नामांकित असलेल्या सीए फर्ममध्ये (वार्षिक उलाढाल रुपये १ लाख!) त्याने आपल्या कामाला सुरुवात केली. स्लोन स्कूलचा एमबीए रवी कायमच नवनव्या संधी शोधत होता. मग आपल्याच एका अशिलासाठी माहिती संकलन व विश्लेषण करण्याचे छोटेसे काम असो वा भारतात संगणकाचे आगमन झाल्यावर चक्क ३ ‘पीसी’ज भाड्याने घेऊन त्यांचा वापर करायला शिकून त्यांचा उपयोग करून आपल्या ग्राहकांसाठी कामे करून देण्याचे द्रष्टेपण असो.
हेही वाचा : वर्धानपनदिन विशेष : पुणे शहराच्या राजकारणाचा अंतरंग
माहिती संकलन, विश्लेषण, संशोधन व विकसन ही कामे करायला एक वेगळी कंपनी काढणे ओघानेच आले. केपीआयटीची स्थापना योग्य वेळी करून सरकारच्या अर्थव्यवस्थेतील उदारीकरणाच्या निर्णयाचा फायदा घेणे यात स्लोन स्कूलच्या शिक्षणाचा नक्कीच मोठा हातभार आहे असे रवी मानतो. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी फार चंचल असतात व ते एका जागी फार काळ राहत नाहीत हे वास्तव आहे. पण सुरुवातीपासून केपीआयटीमध्येच असलेले अनेक लोक आजही तिथेच आहेत. याला नक्कीच रवीने केपीआयटीचा घडवलेला ‘डीएनए’ कारणीभूत आहे.
भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘सेवा’ ( IT services and consulting) देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण मोठ्या सरोवरातील छोटा मासा बनून राहण्याऐवजी रवीने Automotive and Mobility Engineering ची वेगळी व धाडसी वाट निवडली. कंपनीची वाढ झपाट्याने होण्यासाठी बऱ्याचदा कंपन्या दुसऱ्या कंपन्यांबरोबर भागीदारी करतात वा त्यांना खरेदी करतात. २००२ मध्ये कमिन्स इन्फोसिस्टम्स बरोबर केलेली भागीदारी ही दूरगामी परिणाम करणारी ठरली. Embedded software मध्ये प्रावीण्य मिळवण्याबरोबरच mobility engineering मध्ये अनेक संशोधनांचे हक्क (पेटन्ट) ही केपीआयटीने मिळवले. ग्राहकसंख्या व उलाढाल खूप वाढूनही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत कामे करण्याऐवजी रवीने विद्याुतचलित व वाहनविषयक तंत्रज्ञानावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा : डॉ. प्रमोद चौधरी ‘प्राज’पर्वाचे प्रवर्तक
त्यासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी आपल्या उलाढालीचा जवळजवळ ७० भाग सोडून दिला तेव्हा बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या होत्या. पण आज त्या क्षेत्रातील भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ कंपन्यांमध्ये केपीआयटीची गणना होते. एवढेच नव्हे तर पाच वर्षांपूर्वी असलेल्या उलाढालीच्या नऊपट झालेली उलाढाल रवीच्या याच द्रष्टेपणाची साक्ष देते.
केवळ स्वत:चा व्यवसाय चालू केला एवढेच नाही तर त्यात एवढे नेत्रदीपक यश मिळाले याचे रहस्य काय असे विचारता रवीने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. तो म्हणतो :
१. तुम्हाला ज्या गोष्टीचा ध्यास आहे अशाच गोष्टी करा आणि त्या गोष्टींमध्ये तितकाच रस असणाऱ्या लोकांना बरोबर घ्या. कारण यश हे व्यक्तिगत नव्हे तर सांघिक परिश्रमातून मिळते.
२. तुमच्याइतक्या किंवा जमल्यास तुमच्यापेक्षा चांगल्या लोकांना बरोबर घ्या. त्यांना त्यांच्या योग्यतेचे काम, श्रेय, मान व पैसा द्या. कुणाला तुमच्यापेक्षा जास्त पगार द्यायला मागेपुढे पाहू नका.
३. अपयशाची तयारी ठेवा. सुरुवातीला अनेकदा अपयश येईल. त्याने खचून न जाता लवकरात लवकर सावरून पुन: प्रयत्न करा.
४. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे, सचोटीने काम करा आणि शुद्ध नीतिमूल्ये ठेवा. हे आदर्श तुम्ही घालून द्या.
हेही वाचा : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार दोन लाख मतांनी निवडून येतील – संजय काकडे
याशिवाय रवीचा चार ‘ ए’ २: Education, Environment, Energy and Employee Engagement बद्दल विशेष आग्रह असतो. गेली ७-८ वर्षे ‘छोटा सायंटिस्ट’ या उपक्रमात देशभरातून १ लाखाहून अधिक शालेय विद्यार्थी भाग घेतात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी केपीआयटी स्पार्कल या शास्त्रीय प्रकल्प स्पर्धेत जवळपास २० हजार विद्यार्थी भाग घेतात. पहिले पारितोषिक रुपये १० लाखांचे असल्याने स्पर्धेचा दर्जा व चुरस दरवर्षी वाढतच आहे. शिवाय मोबिलिटी इंजिनिअरिंग या विषयावरील आपल्या देशात प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्तम शोधनिबंधालाही पारितोषिक दिले जाते. पर्यावरण व संतुलित जीवनमान हे रवीच्या खास जिव्हाळ्याचे विषय असून तो ‘जनवाणी’ या बिनसरकारी सेवाभावी संस्थेचा संस्थापक विश्वस्त व पुणे इंटरनॅशनल सेंटर या संस्थेचा संस्थापक विश्वस्त व खजिनदार आहे. याखेरीज सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा संस्थापक मार्गदर्शक, ज्ञानप्रबोधिनी या सुप्रसिद्ध संस्थेचा अध्यक्ष, CEERI Research Council चा चेअरमन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा माजी अध्यक्ष, ‘Leapfrogging to Pole Vaulting’ या पुस्तकाचा सहलेखक व अनेक पुरस्कारांचा, पारितोषिकांचा मानकरी आहे. जागेअभावी ती माहिती दिलेली नाही त्याबद्दल क्षमस्व!
रवीबाबत ‘ Nice guys finish last’ या म्हणीत बदल करून ‘ Nice Guys Finish First Too!’ असं नक्कीच म्हणता येईल. ईश्वर त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो व त्याच्या हातून अशीच उत्तमोत्तम कामे होत राहोत ही शुभेच्छा