चाकणमध्ये घराच्या छतावर विजेचा करंट लागून आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पल्लवी जाजू असे आई तर समर्थ जाजू असे १४ वर्षीय मुलाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.
हेही वाचा – महापालिकेचे दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात… कोणत्या कामासाठी घेतली लाच?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील खराबवाडी येथे जाजू कुटुंब राहत. मंगळवारी साडेपाचच्या सुमारास आई टेरेसवर स्वच्छता करण्यासाठी गेली होती. तर, मुलगाही टेरेसवर गेला होता. जिन्यातून पाणी आत येऊ नये म्हणून करण्यात आलेल्या छताच्या पत्रात विद्युत प्रवाह उतरला होता. तिथंच लोखंडी अँगलमधून तार लोंबकळत होती. त्यातही विद्युत प्रवाह उतरला होता. त्याला सर्मथचा हात लागला, त्याला करंट लागल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यात दोघांचाही करंट लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.