पिंपरी- चिंचवड : बारामती हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी- चिंचवड च्या चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. दोघे ही राहणार सोमेश्वर नगर सोरटेवाडी येथील आहेत. आरोपींना खेड मधील बहुल मधून ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सुरेश गाडेकर शनिवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बारामती पोलीस देखील आरोपींचा शोध घेत होते. ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मयत रोहित गाडेकर हा आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशांचा तगादा लावत होता. तसेच त्यांना मारहाण करायचा याच कारणावरून रोहित गाडेकर ची हत्या करण्याचा प्लॅन केला. शनिवारी रोहित गाडेकर ची हत्या करण्यात आली. आरोपी पुण्याचे खेड मध्ये फरार झाले.
चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना माहिती मिळाली की, आरोपी हे खेड बहुल येथे एका गोठ्यात लपून बसले आहेत. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्यांना ताब्यात घेतल आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे. अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे.