पुणे : कर्ज, नोकरी, लॉटरी अशा प्रकारची आमिषे दाखवून होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने ‘चक्षू’ ही प्रणाली विकसित केली आहे. फसवणुकीसंदर्भातील तक्रारी ‘संचारसाथी’ या संकेतस्थळावर नोंदवता येणार असून, माहितीच्या सुरक्षित देवाणघेवाणीसाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मही (डीआयपी) विकसित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यमंत्री देवुसिंह चौहान, विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल या वेळी उपस्थित होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार रोखण्यासाठीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुरक्षित भारत उपक्रमांतर्गत सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यात राष्ट्रीय, संस्था आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सायबर फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठीची जागृती नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. चक्षू आणि डीआयपी या प्रणालींमुळे सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्याच्या, सायबर सुरक्षेतील धोके तपासण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. सुरक्षित पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (डीआयपी) या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. चक्षू ही प्रणाली, त्याचा वापर या संदर्भातील अधिक माहिती https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakshu system will prevent cyber fraud pune print news ccp 14 amy
Show comments