लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: बंगालच्या उपसागरात सहा ते नऊ मे च्या सुमारास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याची शक्यता असल्याने हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी वाचा- पिंपरी: लग्नास नकार दिल्याने महिलेसोबतच्या संवादाचे व्हिडिओ युट्युबवर केले शेअर
आयएमडीने अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टिम आणि युरोपियन सेंटर फॅार मिडियम रेंज फोरकास्टच्या अहवालांचा संदर्भ देत ही शक्यता वर्तवली असून बंगालच्या उपसागरातील परिस्थितीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे लक्ष आहे. सर्व आवश्यक माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयएमडीकडून सांगण्यात आले आहे.