पुणे : Maharashtra Weather Forecast दक्षिण गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मोसमी पावसाला पोषक स्थिती नाही. अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्यामध्येही फारसा जोर नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात हलका पाऊस सुरू आहे. २५ तारखेनंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

घाट परिसरात संततधार

मागील २४ तासांत घाट परिसरात संतधर पाऊस पडला आहे. लोणावळय़ात ३६, कोयना (नवजा) २२, खोपोली ४८, ताम्हिणी ३० आणि भिरा येथे ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.