लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेत मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेल्याची घटना घडली. या बाबत चित्तरंजन वाटिकेतील सुरक्षारक्षक शामराव पवार (वय ३९, रा. वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चित्तरंजन वाटिकेत मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी उद्यानातील बांबुच्या बेटाजवळ असलेली चंदनाची दोन झाडे कापून नेली. चंदनाची झाडे कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पवार यांनी पोलिसंकडे तक्रार दिली. सहायक पोलीस फौजदार भैरवे तपास करत आहेत.

आणखी वाचा-पुणे: आवक घटल्याने कांदा, मिरची, गाजर, शेवग्याच्या दरात वाढ

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी शासकीय कार्यालये, बंगल्याच्या आवरात शिरुन चंदनाची झाडे कापून नेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कोथरुडमधील वुडलँड सोसायटीतील सुरक्षारक्षकाला मारहाण करुन चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले होते. खडकीतील किर्लोस्कर कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक आणि चंदन चोरट्यांमध्ये झटापट झाली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandan theft in chittaranjan ward in model colony pune print news rbk 25 mrj