लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्यानंतर सात वर्षे रखडलेल्या चांदणी चौकातील पुलाने अवघ्या दहा महिन्यांत उड्डाण घेतले आहे. गेली सात वर्षे उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकले नसते तर, चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले असते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…

वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल येत्या शनिवारपासून (१२ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१२ ऑगस्ट) उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, गेल्या सात वर्षांत या उड्डाणपुलाच्या निर्माणात विविध अडथळे आले. त्यामुळे उड्डाणपुलाचे कामही सातत्याने रखडले होते. या उड्डाणपुलासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

हेही वाचा… राज्य हिवताप, डेंग्यूने फणफणले! गडचिरोली, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

चांदणी चौक आणि कोथरूड परिसरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल प्रस्तावित केले होता. मात्र महापालिकेच्या आराखड्यात काही तांत्रिक चुका असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाचा आराखडा केला. केंद्रीय रस्ते आणि विकास मंत्रालयाकडून या उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटींचा निधी जाहीर केला होता. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तेच सात वर्षांपूर्वी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर उड्डाणपुलाचे काम रखडले. तब्बल चारशे कोटींचा हा प्रकल्प असून, केंद्रीय जलवाहतूक आणि भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे ऑगस्ट महिन्यात भूमिपूजन झाले आहे.

हेही वाचा… अखेर पिंपरी महापालिकेतील नोकरभरतीचा निकाल जाहीर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार असले तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन महापालिकेकडून करून देण्यात येणार होते. भूसंपादनाबरोबरच अतिक्रमण, जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, मल:निस्सारण वाहिन्या आदी नागरी सुविधांचे स्थलांतराचे काम महापालिकेकडून नियोजित वेळेत पूर्ण झाले नाही. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आला नाही. उड्डाणपुलाच्या कामात जैवविविधता उद्यानाची काही जागा येत असल्यानेही त्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मुळातच या उड्डाणपुलाच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आणि कामे संथगतीने सुरू होत राहिली. भूसंपादनासाठी महापालिकेकडे निधी नसल्याने उड्डाणपुलाच्या कामासाठी विशेष बाब म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८२ कोटींचा निधीही मंजूर केला होता.

हेही वाचा… महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड; मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केलेल्या आराखड्यानुसारच उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर आराखड्यात काही सुधारणा करण्यात आल्या. ही कामे दहा महिन्यांत पूर्ण करण्यात आली. मात्र, वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला नसता तर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असते का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडूनही निधी मंजूर करून घेण्यात आला होता. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना नागरिकांनी मोठी सहनशीतला दर्शविली. उड्डाणपुलामुळे वाहतूक सुकर होईल. – प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार, कोथरूड