भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जांब येथे खून झालेल्या चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार वालचंदनगर पोलिसांकडे दिली असल्याची माहिती उघड झाली आहे.
दादा शिवाजी जाधव व सत्पाल महादेव रूपनवर यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गायकवाड हे मध्ये पडले होते. त्या वेळी बाचाबाची होऊन रूपनवर याने रिव्हॉल्व्हरमधून गायकवाड याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. गायकवाड यांनी जिवाला धोका असल्याची तक्रार १८ जानेवारीला दिली होती. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
आणखी वाचा