पुणे : ‘पुणे शहर लेखन, वाचन, चिंतन आणि संशोधनाची प्रयोगशाळा आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव विश्वविख्यात होईल,’ असा विश्वास राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला. ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे अनुकरण राज्यातील सर्व शहरांना करावेसे वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महोत्सव नागपूरमध्ये आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, नागपूरचा महोत्सव मोठा होणार की पुण्याचा हे आता तुम्ही ठरवायचे आहे,’ असे आवाहनही पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक रविवारी सायंकाळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे झाली. त्यावेळी पाटील बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ‘एनबीटी’चे सहायक संचालक (प्रदर्शन) मयांक सुरोलिया, संयोजन समिती सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, प्रा. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी

‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ चौपट मोठा होईल. त्याद्वारे पुस्तक प्रदर्शनांच्या जगतात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होईल. पुणे पुस्तक महोत्सवाचे अनुकरण सर्व शहरांना करावेसे वाटत आहे, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे हा महोत्सव आयोजित करायचा आहे. त्यामुळे पुण्याचा महोत्सव मोठा करायचा की नागपूरचा, हे ठरवावे लागेल. या महोत्सवासाठी कोथरूड येथील फिरत्या ग्रंथालयांसाठी आणि काॅलनीमधील ग्रंथालयांसाठी पुस्तकांची खरेदी केली जाईल,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुण्याच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली नाळ असून, सारस्वतांच्या पंढरीची नामदेवांची पायरी आहे. पुस्तकांच्या या कुंभमेळ्यात पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुणेकरांनी साहित्यस्नान करावे. त्यातून पुणेकर हे साहित्यप्रेमी असल्याची हरवलेली ओळख पुन्हा प्रस्थापित होईल,’ असे अभिनेता प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक

‘पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुणेकरांचा महोत्सव असून, त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून संघशक्तीच्या जोरावर ही वाचन चळवळ यशस्वी करावी,’ असे आवाहन राजेश पांडे यांनी केले. बागेश्री मंठाळकर यांनी महोत्सवाच्या नियोजनासाठी निर्माण केलेली खाती आणि खातेप्रमुखांची माहिती दिली. डॉ. आनंद काटीकर यांनी सूत्रसंचालन केले.