पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले. या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले होते. पण या बैठकीच्या ठिकाणी चंद्रकांत पाटील हे येताच अधिकार्‍यांना विचारले की, दादा आले आहेत का? त्यावर अधिकारी म्हणाले, दादा आले नाही. अजितदादा पुन्हा गायब झाले का? अस विधान चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी केले होते. ते विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबईतील बैठकीमुळे कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मी माझी भूमिका चंद्रकांत पाटील यांना त्याचवेळी सांगितली होती असेही अजितदादा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीच्या बैठकीबाबत मला पहिल्यांदा सांगण्यात आलं की, ती बैठक दहा वाजता होणार, त्यानंतर अकरा वाजता आणि पुन्हा बारा वाजता बैठक होणार असल्याचं सांगण्यात आले. पण त्याच दिवशी मुंबईत दुपारी तीन वाजता शरद पवार यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळेनुसार मी बैठकीला उपस्थित होणार होतो. त्याबाबतची कल्पना शरद पवार यांना दिली होती. तसेच मी देखील पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो असून माझ्या कामाची पद्धत पुणे जिल्हय़ातील नागरिकांनी पहिली आहे. माझी बैठक सात म्हणजे सात इकडे तिकडे पाच मिनिटं कधीच होऊ दिले नाही. ही आपल्या कामाची पद्धत आहे. पण दादांना (चंद्रकांत पाटील) खूप मोठ्या प्रमाणावर व्यप आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा पुढे पुढे ढकलल्या जात आहेत आणि पुन्हा तिथे येऊन अजित पवार नॉट रिचेबल म्हणाता, आहो दादा तर रिचेबल होता. मी दादासाठी धावपळत आल्याचे म्हणता ते मी पाहत होतो. तरी देखील ते उशिराच आले. असा टोला अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.