भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना. त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले.धर्मवीर संबंधीच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचा प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून निघून गेले.
हेही वाचा >>> खंडाळ्यात जलतरण तलावात बुडून पर्यटक युवकाचा मृत्यू
मागील काही दिवसात शहरात गुन्ह्यांच प्रमाण वाढलं असून त्यात कोयता गँगच प्रमाण वाढलं आहे. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी पुण्यात आलो त्यावेळी लोकसंख्या १५ लाख होती.आज याच शहराची लोकसंख्या ६० लाखाच्या पुढे गेली आहे.या आपल्या शहरात राज्यासह देश विदेशातून नागरिक शिक्षण, तसेच कामानिमित्त येत आहे.त्या सर्वांचा पोलीस स्टेशनमध्ये डाटा नसणे.कोण कोणत्या कामासाठी येथे आला आहे.त्यामुळे अशा घटना घडत आहे. या घटना लक्षात घेता पोलिस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी पर्यन्त पोहोचत आहे.तसेच गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की,देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना गुंडगिरीवर वचक निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील गुन्हेगारी विरोधात कठोर पावले उचलली जात आहे.गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना जामीन होऊ नये आणि केस लवकरात लवकर निकाली निघावी.तसेच गुन्हेगारांला लवकर शिक्षा व्हावी यासाठी पावली उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.