लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा: तळेगाव दाभाडेतील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मी लक्ष घालणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले.

आवारे कुटुंबीयांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. आवारे कुटुंबीयांचे पाटील यांनी सांत्वन केले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे आदी या वेळी उपस्थित होते. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना, पत्नी विद्या, भाऊ रवींद्र, मुलगी प्रियंका तसेच नातेवाईक उपस्थित होते. आवारे खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.