पुणे: भाजपा अनेक महिन्यापासून निवडणुकीची तयारी करत आहे. विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू आहे. शिवसनेच्या वाट्याला ज्या जागा जातील हे आत्तापासून ठरवण्याचे काही कारण नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल असे विधान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. संपाबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. परंतु, परीक्षार्थी आणि रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे आहे. अत्यावश्यक सेवामधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करावं आणि बाकी कर्मचाऱ्यांनी संप करावा असा देखील त्यांनी म्हटलं आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड शहरातील विविध विकास कामांची उदघाटने करण्यात आली.

आणखी वाचा- शिंदे फडणवीस सरकार एक दिवशी थांबेल- दिलीप वळसे पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाने काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभेची आम्ही तयारी करत आहोत. शिवसेनेच्या वाट्याला ज्या जागा जातील हे आत्तापासून ठरवण्याचे काही कारण नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल.

पुढे ते म्हणाले की, राज्यसरकार जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक आहे. तीन टॉप च्या निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. माझं सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की परीक्षाचा कालावधी आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. फिरत्या रुग्णालय रुग्णांची मदत करत आहे. हे काही बरोबर नाही. माझं आवाहन आहे की अत्यावश्यक सेवामधील कर्मचाऱ्यांनी काळ्या भीती लावून काम करावं आणि बाकी कर्मचाऱ्यांनी संप करावा.

Story img Loader