महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फडणवीसांच्या आरोपांचे खंडण करण्यात येत आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : बीआरटी मार्गावरील बसथांब्यांच्या स्वच्छतेसाठी फिरते वाॅशिंग सेंटर

पाटील म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी लहान वयात एक विश्वासार्हता निर्माण केली. तसेच ते कोणत्याही विषयावर माहितीच्या आधारे बोलतात आणि त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. माझ्या सारख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी निरागसपणे काहीतरी म्हणतो आणि माझ मन मोठं असल्याने दिलगिरीही व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला फार काळ आंदोलन करण्याची संधी मी देत नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितल आहे. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

हेही वाचा- पुणे महापालिका भवनासमोरील नदीकाठ परिसर कचऱ्याच्या विळख्यात

जयंत पाटलांच्या विधानाला काही अर्थ नाही

राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी अजित पवार यांनी पहाटेचा शपथ विधी करण्याचा निर्णय घेतला. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की,अशा प्रकाराचे गौप्यस्फोट त्या त्यावेळी का केले जात नाही. त्यामुळे उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला काहीच अर्थ नाही.संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे याला काही अर्थ नसल्याच सांगत जयंत पाटील यांना त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा- पुणे : तीन वर्षांत कसब्यातील मतदारांत १५ हजाराने घट; चिंचवडमध्ये ४८ हजार मतदार वाढले

३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी रोजी दिल्लीतून उमेदवार घोषित होतील

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी बाबत निवडणुक आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नाही. त्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक येथील उमेदवाराबाबत नावाची यादी तयार झाली आहे. ती यादी केंद्राच्या समितीकडे आम्ही उद्या पाठविणार आहोत. केंद्रीय समिती ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी रोजी बैठक घेईल.त्यावेळी आमच्या यादीवर निश्चित विचार करतील. त्यावर आम्हाला चार वेळा प्रश्न विचारले जातील आणि दिल्लीतून ३१ किंवा १ तारखेला नावाची घोषित करतील अशी भूमिका त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil reaction on devendra fadanvis allegations against mahavikas aghadi svk 88 dpj