पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही मतदारसंघातील विजयी उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली. आमदार अण्णा बनसोडे यांच्या पक्ष कार्यालयात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी गराडा घातल्यानंतर पाटील यांनी हात जोडून बोलण्यास टाळले. त्यापूर्वी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना चॉकलेटचे देऊन तोंड गोड केलं.

चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा असू शकतो असं भाकीत केलं होतं. ते पुन्हा आज काय? बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. असं असताना हाच प्रश्न आपल्याला पुन्हा येऊ शकतो हे लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी हात जोडत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मी दातांच्या उपचारासाठी शहरात आलो आहे. अस म्हणत चंद्रकांत पाटील यांनी बोलण्यास नकार दिला.

आणखी वाचा-शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारून खुनाचा प्रयत्न, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून दिल्लीत खलबत सुरू आहेत. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव काही वेगळेच सांगत असल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. हे सर्व पाहता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.