पुणे: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३ मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र,गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता.त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि काल रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.या पक्ष प्रवेशामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मागील पाच वर्षाच्या कालावधीत रविंद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे आणि रविंद्र धंगेकर यांचा महायुतीमधील शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्याने,पुणे शहरातील भाजपच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू ऐकण्यास मिळत आहे.

त्याबाबत भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,धंगेकर यांच्यासोबत आमचा नुसता पंगा नाही.तर आम्ही एकमेकांविरोधात निवडणुक लढवली होती.एकदा हरलो पण त्यांना दोनदा हरवल, राजकारण आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट ही काळच्या ओघात बदलत असते,याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत,त्याबाबत सांगायच झाल्यास तीन पक्षाचे सरकार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता, तर मग मी त्या विरोधात भांडलो असतो. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचे स्वातंत्र्य त्या त्या पक्षाला आहे.तसेच तिघांचं मिळून सरकार आहे तिघे एकत्रित मर्ज झालेले नाहीत किंवा तिघांची एकत्रित घटना तयार केलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वाटलं असावं की, पुण्यामध्ये काम वाढवायचे आहे त्या हेतूने कदाचित त्यांनी धंगेकरांना घेतले असावे. ते पुढे म्हणाले, ते आता आमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य झालेले आहेत. कार्यकर्ता हा त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणार,एवढं तरी आमच्या पक्षात स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आता संघर्ष होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.