विधान परिषदेवर निवडून द्यायच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा २३८० मतांनी विजय केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना ६१४५३ मते मिळाली तर सारंग पाटील यांना ५९०७३ मते मिळाली.
सोमवारी सकाळपासून या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या फेऱीपासूनचे चंद्रकांत पाटील आघाडीवरच होते आणि शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली आणि ते विजयी झाले. या निवडणुकीतील आणखी एक उमेदावर अरूण लाड यांना ३२ हजार मते पडली.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी
विधान परिषदेवर निवडून द्यायच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा २३८० मतांनी विजय केला.
First published on: 25-06-2014 at 10:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil won pune graduate constituency election