पुणे : पुणे विमानतळातील नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशाअंतर्गत प्रवासी विमान वाहतुकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी सर्व पैलूंचा अभ्यास करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केल्या.

पुणे विमानतळ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की नव्या टर्मिनलमुळे विमानफेऱ्यांची संख्या २१८ पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे देशाअंतर्गत विमान वाहतुकीच्या दृष्टीने पुरेशी व्यवस्था निर्माण होणार आहे. यासोबत भविष्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढविण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. त्या दृष्टीने आवश्यक अभ्यास करण्यात यावा. पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. तसेच, नव्या टर्मिनलसाठी आवश्यक रस्त्याच्या कामालाही गती द्यावी.

Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

हेही वाचा – जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून राजस्थानमधील चोरट्याने ‘अशी’ केली फसवणूक

हेही वाचा – पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार

दिवसाला ३० हजार प्रवासी

पुणे विमानतळातून दररोज सुमारे तीस हजार प्रवासी प्रवास करतात आणि त्यातील सुमारे ५४० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ५९ हजार ४५१ विमानफेऱ्यांद्वारे ८० लाख प्रवाशांनी प्रवास केला. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत ३१ हजार ५९१ विमानफेऱ्यांद्वारे पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या ४७ लाखांहून अधिक आहे. नवे टर्मिनल सुरू झाल्यावर ही संख्या दुपटीने वाढणार आहे. नव्या टर्मिनलचे क्षेत्रफळ ५१ हजार ५९५ चौरस फूट आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.