अविनाश कवठेकर

पुणे : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचे तीव्र पडसाद उमटत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानाबाबत गुरुवारी जाहीर माफी मागितली. पडळकरांनी केलेले वक्तव्य संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजप या प्रकाराचे कधीही समर्थन करणार नाही. पडळकर यांना समज देण्यात आली आहे. त्यांच्या विधानामुळे अजित पवार यांचे मन दुखावले असल्याने त्यांची जाहीर माफी मागतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देण्यासाठी बावनकुळे पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, ‘महायुती असून वेगळे विचार असू शकतात. मतभेद असले तरी मनभेदातून व्यक्तिगत टीका करणे हे राज्याच्या संस्कृतीत नाही. भाजपच्या संस्कृतीलाही हे शोभणारे नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर अजित पवारांबाबत जे काही बोलले त्याबाबत मी जाहीर माफी मागतो.’

हेही वाचा >>>चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

अजित पवार यांनी पडळकर यांना मोठ्या मनाने माफ करावे. यासंदर्भात पवार यांच्यासमवेत बोलणार आहे. पडळकर यांना पक्षाकडून अशी टीका न करण्याची समज देण्यात आली आहे. एका जबाबदार विधानपरिषद सदस्याने असे बोलणे योग्य नाही, हे त्यांना सांगण्यात आले आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Story img Loader