“खोट बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही. तसेच जे घडले असेल तेच त्यांनी सांगितले असणार. ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे त्यावर बोलायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आणि त्यांचा (शरद पवार) इतिहास बघितल्यावर देवेंद्र फडणवीस हे खरे बोलत आहेत, असे वाटते. तसेच, २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्याकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कधीही सूड भावनेने त्यांनी काम केले नसून, उलट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला आहे”, अशी भूमिका मांडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे बावनकुळे यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पहाटेच्या शपथ विधीला शरद पवार यांच्या सांगण्यावरून गेले होते, असे विधान भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावरून राजकारण पाहण्यास मिळत असून यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”

हेही वाचा – पुणे : महावितरणच्या विधी सल्लागारांना लाच घेताना पकडले, महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात ‘एसीबी’ची कारवाई

मी देवेंद्र फडणवीस यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, देवेंद्र फडणवीस हे राजकारणाकरिता स्वतःची खुर्ची वाचविण्याकरिता किंवा खुर्ची मिळविण्याकरिता कधीच असत्य कथन करीत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे परिणामी अनेक वेळा नुकसान झाले आहे. गंगाधर फडणवीस यांचे त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यामुळे ते कधीही असत्य विधान करू शकत नाही. ते त्यांच्या रक्तात नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस यांचे नुकसान झाले का? या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे खरच नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्‍यावर उद्धव ठाकरे यांनी आमदार निवडून आणले. त्यावेळी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे अनेक वेळा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत. त्यादरम्यान झालेल्या निवडणुकीचे निकाल येताच तिकडे दरवाजे बंद करण्यात आले. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली माहिती नाही, पण देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची भीती होती, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – बीबीसी कार्यालयावरील छाप्याचे पुण्यात पडसाद; केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन

महाभारतामध्ये अभिमन्यूचा वाद झाला. पण लढाई ही पांडवांनी जिंकली आहे. देवेंद्र फडणवीसांना अभिमन्यू करण्यात आले. पण लढाईदेखील जिंकली असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक युती झाली आहे. ते दोघे चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे सांगत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी टीका केली.

कसबा पोटनिवडणुकीकरिता आम्हाला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला होता का? त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी चर्चा केली आहे. त्याचबरोबर कालच मनसेने आम्हाला या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच, या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सहभागी होण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करणार, असे ते म्हणाले.

हेही वाचा – पुणे : फिनिक्स मॉलमधील व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का

कसबा पोटनिवडणुकीत राज ठाकरे यांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने चर्चा करणार : चंद्रशेखर बावनकुळे

त्यांनी आमचे या निवडणुकीत ऐकल नाहीबावनकुळे

कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे, अशी मदत महाविकास आघाडीला मागितली होती. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर आम्ही नेत्यांनी चर्चा करून तातडीने अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली. आम्ही त्यांचे अंधेरीत ऐकले, पण त्यांनी आमचे या निवडणुकीत ऐकले नसल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावंर नाराजी व्यक्त केली.

Story img Loader