लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, हे महत्त्वाचे नाही. बारामती जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा उमेदवार बारामतीमध्ये असेल तर त्यालाही विजयी केले जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा या निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सुळे यांच्या विरोधात पवार कुटुंबीयातील उमेदवार देणार का, अशी विचारणा बावनकुळे यांच्याकडे केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पदाधिका-यांशी त्यांनी संवाद कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आणखी वाचा-पदवीचे विद्यार्थी आता कामाला लागणार… ६० ते १२० तासांची इंटर्नशीप बंधनकारक

बारामती मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. तो कोणत्या पक्षाचा असेल हे वरिष्ठ नेते ठरवतील. अजित पवार गटाचा उमेदवार असला तरी त्याला महायुतीची ५१ टक्के मते मिळतील. त्यामुळे उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. बारामती जिंकण्याचा निर्धार असून कार्ययकर्ते सहाशे घरांना भेटी देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहील या शरद पवार यांच्या विधानाबाबबत बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही त्यांना शरद पवार यांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही.