लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कुटुंबातील किंवा परिवारातील एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी संपूर्ण परिवाराला किंवा विचारधारा चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदीप कुरूलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संबंधाबाबत सारवासारव केली.

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
Two arrested for attacking Chandrakant Tingre Pune print news
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली
Rahul and Priyanka Gandhi stopped by police at Ghazipur
संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला

समीर वानखेडे असो की कुरूलकर दोषांवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी सुरू असल्याने त्याबाबत बोलता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यकारिणी समिती बैठकीसाठी आलेले बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धार्मिक विषय धार्मिक पद्धतीनेच हाताळले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी त्रंबकेश्वर वादाबाबत मांडली.

आणखी वाचा-बैलगाडा शर्यतीसाठी ११ वर्षे पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले, “हा ऐतिहासिक निकाल…”

भाजप आणि संघ परिवाराशी डॉ. प्रदीप कुरूलकर संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य काही पक्षांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. कुटुंबातील किंवा परिवारातील कोणी गुन्हा केला, तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. त्यासाठी कुटुंबाला किंवा परिवाराला जबाबदार धरता येणार नाही. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपीची चौकशी सुरू आहे. गुन्हा करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे. धार्मिक विषय धार्मिक पद्धतीने हाताळले पाहिजेत. यात कोणताही धर्म मध्ये आणता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader