लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी झाली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदीउपस्थित होती. या बैठकीवेळी नड्डा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची पत्रकार परिषद झाली. अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता, आणखी काही मोठे नेते भाजपमध्ये येणार आहेत. त्यामुळे अजून काही बॉम्बस्फोट नक्कीच होतील असे बावनकुळे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्यही झाले. या अनुषंगाने अजित पवार यांचा भाजपप्रवेश कधी होणार असा प्रश्न बावनकुळे यांना विचारल्यावर त्यांनी काहीही उत्तर न देता केवळ स्मितहास्य केले.
आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यातच कर्नाटक निवडणुकीत भाजपला मोठा पराभव झाल्यामुळे भाजपकडून जोरदार प्रचार, संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांनी केलेल्या स्मितहास्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरू झाली आहे.