फोटोग्राफी कलेमुळे चित्रकलेचा आयाम बदलला आहे. वेगवेगळी शैली, नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे फोटोग्राफीला नवा आकार मिळाला असल्याचे मत ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे यांनी शनिवारी व्यक्त केले.
मॅक्समुल्लर भवन, गोथे इन्स्टिटय़ूट आणि महापालिकेतर्फे आयडेंटिटिज अँड पर्सनॅलिटिज या संकल्पनेवर आधारित ‘बिइंग वुमन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन परांजपे यांच्या हस्ते झाले. संभाजी उद्यान येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात याना वेर्निके, अभिजित पाटील, नूपुर नानल आणि तपन पंडित यांच्या छायाचित्रांचा समावेश असून, ९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. मॅक्समुल्लर भवनचे संचालक कार्ल पेशाटचेक, ज्ञानप्रबोधिनीच्या डॉ. आर्या जोशी, फग्र्युसन महाविद्यालयाच्या डॉ. सविता केळकर आणि पोलीस निरीक्षक सुचेता खोकले या वेळी उपस्थित होत्या.
परांजपे म्हणाले, स्त्रियांची विविध रूपे या प्रदर्शनातून पाहण्यास मिळतात. स्त्रीला समाजामध्ये मिळणारी वागणूक, तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा एकेकाळी वेगळा होता. मात्र, मध्ययुगीन काळानंतर तो दृष्टिकोन बदलत गेला. हे प्रदर्शन स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील बदल घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा