पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० या नवीन संगणक प्रणालीद्वारे अर्ज करावे लागत आहेत. मात्र, या प्रणालीत कागदपत्रे अपलोड करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जुनेच अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, इतर कागदपत्रांची पडताळणी तातडीने करण्याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे.

‘म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीला विलंब’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १० जानेवारीला प्रसिद्ध केले. त्यानंतर म्हाडाने कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेत काही बदल केले आहेत. म्हाडाच्या माध्यमातून सोडत काढून घरे देण्यासाठी इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० ही नवीन संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीचा प्रथमच अवलंब म्हाडाच्या पुणे मंडळाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीद्वारे करण्यात येत आहे. मात्र, या प्रणालीत काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज्ञावलीत काही बदल करण्यात आले आहेत.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा – “सत्तेविरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे छापे पडतात”; हसन मुश्रीफांवरील कारवाईवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपा नेते…”

प्रामुख्याने नवीन राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करून जुने अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची मुभा देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना आयएलएमएस प्रणालीचे अभियंता जितेंद्र जोशी म्हणाले, ‘नवीन प्रणालीनुसार इच्छुक अर्जदारांनी ५ जानेवारीपासून अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, चार-पाच दिवसांनी देखील कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे निदर्शनास आले. नवीन प्रणालीत सर्व कागदपत्रांची पडताळणी ही केंद्र-राज्य शासनाच्या संबंधित विभागांनी साठवून ठेवलेल्या विदा संचावरून (डाटाबेस) होत आहे. शासनाच्या विविध विभागांना तातडीने कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जुन्या राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्रात (डोमेसाईल) आणि नवीन प्रमाणपत्रात मोठी तफावत आहे. नवीन अधिवास प्रमाणपत्रावर बारकोड असून या पद्धतीची संगणक आज्ञावली तयार करण्यात आली आहे.
अनेक नागरिकांचे जुने अधिवास प्रमाणपत्र असल्याने या प्रणालीत पडताळणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे, जुने अधिवास प्रमाणपत्र अपलोड करताना नवीन अधिवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरल्याबाबतचा महाआयटीकडून देण्यात येणारा विशिष्ट क्रमांक नमूद करावा लागेल.

तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बैठक

सदनिकांसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची प्रक्रिया आयएलएमएस २.० या नूतन संगणक प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यानुसार अर्जदारांना अर्ज भरताना छायाचित्र, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, स्वीकृती पत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार, पॅनकार्ड आदी सात कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. मात्र, पूर्वीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड असणाऱ्यांना अर्ज भरताना अडचणी येत होत्या. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभियंते यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.