पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – खऱ्या इतिहासाची मोडतोड ही सध्या ‘फॅशन’, जेजुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चात शिवेंद्रराजे भोसले यांचे वक्तव्य

हेही वाचा – फेरीवाले, गोरगरीब मजुरांना पंतप्रधान मोदी यांची साद

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागांतील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच ही परीक्षा ३० जानेवारीला घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ८ फेब्रुवारीला वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील अटीशर्तींमध्ये बदल करण्यात आले नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.