लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्याच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमात २८ वर्षांनी बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमाशिवाय नवी कार्यपद्धतीही लागू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी २०२५पासून करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा मान्यताप्राप्त विभागीय, जिल्हा ग्रंथालयांमार्फत घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रम १९७३, १९८५ आणि १९९६ मध्ये बदलण्यात आला होता. सद्यस्थितीत ही परीक्षा १९९६च्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येते. मात्र काळानुरूप अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या शिफारसी स्वीकारून परीक्षेचा अभ्यासक्रम (मराठी, इंग्रजी), परीक्षेची सर्वसाधारण कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित अभ्यासक्रम आणि सुधारित कार्यपद्धती २०२५पासून लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा- जिल्हा प्रशासनाचा स्पष्ट इशारा… राजकीय पक्षांनी केलेल्या ‘वॉल पेंटिंग’वर कारवाई; गुन्हे दाखल होणार…

नव्या अभ्यासक्रमात ग्रंथालय आणि समाज, ग्रंथालय व्यवस्थापन, वर्गीकरण आणि तालिकीकरण, माहिती, साधने आणि सेवा, ग्रंथालय तंत्रज्ञान, कार्यानुभव आणि प्रकल्प या घटकांचा समावेश आहे. सुधारित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा कालावधी १ ते १० जून बदलून २१ ते ३० जून करण्यात आला आहे. अनुत्तीर्ण उमेदवारांना कमाल तीन संधी दिल्या जाणार आहेत.