पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी टाकण्यात येणार असून शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
जलवाहिनी टाकण्याचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- सोलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे, असे पोलिसांच्या वाहतूक शाखेने कळविले आहे.
हेही वाचा – पुणे : विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
u
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे
- सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रस्ता, मम्मादेवी चौकमार्गे स्वारगेटकडे जाईल. त्यामध्ये कोणताही बदल नाही.
- स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी आहे. ही वाहने डावीकडे वळून बिशप सर्कल येथून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याला जातील. हा सर्व मार्ग एकेरी करण्यात येत आहे.
- सोलापूरवरून येणाऱ्या वाहनांना बंदी असून सदर वाहने ही सरळ मम्मादेवी चौक, गोळीबार चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- डॉ. कोयाजी रस्त्याने येणारी वाहने हरप्रित मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पुलगेट बस स्थानक मार्गे कोंढव्याला जातील.
- सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी आहे. ही वाहने गोळीबार चौकातून सरळ आल्यावर उजवीकडे वळून लष्कर मार्गे इच्छित स्थळी जातील.