पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्षे एकच जबाबदारी सांभाळणाऱ्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत. काही अधिकाऱ्यांबद्दल पालिका आयुक्तांकडे थेट तक्रारी गेल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या कामात बदल करत त्यांना नवीन जबाबदारी दिली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे हा विभाग अनेकदा चर्चेत आला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांकडे वर्षानुवर्षे केवळ ठराविक खात्यांचीच जबाबदारी असल्याने त्यांच्यामध्ये शीतयुद्ध वेगवेगळ्या माध्यमातून सुरूच असते.

Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
GBS , patients, Government , private hospitals ,
जीबीएस रुग्णांना दिलासा! खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?

हेही वाचा – येरवडा कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला महिला पोलीस हवालदाराने पकडले

महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी असलेल्या डॉ कल्पना बळीवंत यांच्याकडे जन्म मृत्यू, विवाह नोंदणी आणि स्मशानभूमी, दफनभूमी अद्यावतीकरणची जबाबदारी होती. ही जबाबदारी कमी करून त्यांना मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, मेडिकल यूनिट आणि आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन तसेच पीसीपीएनडीटी आणि एमटीपीची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी पीसीपीएनडीटी आणि एमटीपीची जबाबदारी ही डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडे होती. तसेच १ ते ३ लाख पर्यंतची वैद्यकीय बिलांची देयके मान्य करण्याची देखील जबाबदारी देवकर यांना देण्यात आली आहे.

डॉ. मनीषा नाईक यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून असलेल्या शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेची जबाबदारी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच डॉ. वावरे यांच्याकडे औषध भांडार, महापालिका रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण, आरोग्य प्रकल्प, परिमंडळ १ सनियंत्रण व पर्यवेक्षण अधिकारी अशी जबाबदारी देखील देण्यात आली आहे. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडील सर्व जबाबदाऱ्या कमी करून त्यांना आता नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. डॉ देवकर यांच्याकडे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, विकेंद्रित परवाना विभाग, एड्स, परिमंडळ ३ च्या सनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना

डॉ वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती, (डीपीसी), महापौर निधी, एनसीडी, परिमंडळ ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ राजेश दिघे यांच्याकडे केवळ राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमची जबाबदारी होती. ती तशीच कायम ठेवत त्यांना कीटक प्रतिबंधक विभाग, सीएसआर, स्मशानभूमी, दफनभूमी संबंधित कामकाज, बोगस डॉक्टर शोध मोहीम, परिमंडळ ५ चे सनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Story img Loader