डॉ. पराग काळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या चार दशकांत पुण्याचा प्रचंड वेगानं विस्तार झाला. त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असलेल्या पुण्यात शैक्षणिक संधीही विस्तारल्या. बदलत असलेल्या पुण्यातील शैक्षणिक संधी येत्या काळात कशा बदलणार आहेत किंवा बदलायला हव्यात, याचा घेतलेला वेध…
पुणे… कोणे एकेकाळी ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशा बिरुदावलीने नावाजलेलं एक शहर नव्हे, तर सध्याचं एक महानगर. सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक अभिसरणाचे भारतामधील एक प्रमुख केंद्र. काळ आणि वेळेप्रमाणेच परिस्थितीही बदलत गेली. मुळा-मुठेच्या काठाने विविध पेठांमध्ये वसलेले पुणे नदीच्या पश्चिम भागात विस्तारत गेले. मुंबईच्या दिशेने पश्चिमेकडे सुरू झालेला हा प्रवास पिंपरी चिंचवडच्या पलीकडेही पोहोचला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाने परिचित असलेले आणि परंपरा जपणारे पुणेकर, पुलंच्या भाषेत सांगायचं झाल्यास किमान शब्दांमध्ये ग्राहकाचा कमाल अपमान करून उद्याम व्यवसायात मागे पडलेला पुणेकर, हा आता सर्वांगानी बदलला आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत आपली दुकाने, उद्याोग, व्यवसाय बंद ठेवून वामकुक्षीला प्राधान्य देणारे पुणेकर व्यावसायिक आता ह्यअतिथी देवो भवह्ण या उक्तीला साजेसे अन् अनुरूप व्यवसाय करू लागले आहेत.
हेही वाचा >>> मोठी बातमी : शिक्षक भरती प्रक्रियेत झाली उमेदवारांची शिफारस
शिक्षण आणि त्यामधील क्रांतिकारी बदलांना स्वीकारणारे, अंगीकारणारे पुणे आता वेगाने विस्तारत विद्यापीठाचे शहर म्हणून आगामी काळामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाला ह्यपुणे ऑफ द वेस्टह्ण म्हणण्याइतपत गगनभरारी घेईल, अशी क्षमता काही काळामध्ये पुण्याच्या क्षितिजावर दिसू लागले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या धुरिणांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या शिक्षणसंस्था पुण्याच्या मानबिंदू ठरल्या आहेत. कालांतराने सुरू झालेल्या विनाअनुदानित शैक्षणिक संस्था सर्व शैक्षणिक विश्वामध्ये मैलाचा दगड ठरला आहे. विनाअनुदानित संस्थांचे जाळेच पुण्याच्या चारही दिशांना विस्तारलेले आहे. मोठमोठी निवासी शैक्षणिक संकुले भारतभरातूनच नव्हे, तर जगभरातील विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आकर्षित करत आहेत. पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकच विद्यापीठ, ज्याला आपण राज्य विद्यापीठ म्हणतो, ते पुण्यात उपलब्ध होते. त्याबरोबरच श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाचीही पुण्यात शाखा झाली. बदलत्या काळात अभिमत विद्यापीठ ही नवीन संकल्पना आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीने भारती विद्यापीठ, सिंबायोसिस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज अशा विद्यापीठांची भर पडली.
पुण्यामध्ये सर्व प्रकारचं आणि विविध आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेणारे शिक्षण उपलब्ध आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी त्याच्या व्यक्तिमत्वाचा चतुरस्त्र विकास सहजपणे करू शकतो. वेगवेगळ्या भागांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच विविध प्रकारचं ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यात परदेशी भाषांपासून कला, क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटसारख्या संशोधन केंद्रित संस्थेतून प्राचीन ग्रंथसंपदा उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) एआरडीई, डीआरडीओ अशा नामवंत राष्ट्रीय संस्था, त्यातील तज्ज्ञ पुण्यात उपलब्ध होऊ शकतात.
पिंपरी-चिंचवडसारख्या औद्याोगिक नगरीशी जोडले गेल्यामुळे वाहनोद्याोग, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. पुण्यात शिकायला आल्यानंतर बहुतांश वेळा जवळपासच्या परिसरातच विद्यार्थ्यांना त्यांची कुवत आणि क्षमतेप्रमाणे नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या संधी सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा पुण्यातील एखाद्या चांगल्या नामवंत विद्यापीठाचे बोधचिन्ह आपल्या पदवीवर असावे या दृष्टीने उच्च शिक्षणासाठी पुण्याची निवड करतात. आपला पत्ता आणि महाविद्यालयाचे नाव पुण्यातले असल्यावर नोकरीला बोलावण्याच्या संधी सहजपणे उपलब्ध होतात आणि किमान गुणवत्तेची खात्री निश्चितपणे अधोरेखित होते, यात शंका नाही.
हेही वाचा >>> बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे
काही वर्षापूर्वीपर्यंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयानंतर एमआयटी, सिंहगड, व्हीआयटी, पीआयसीटी, एआयएसएमएमएस अशा अनेक संस्थांची अभियांत्रिकी महाविद्यालये ९०च्या दशकानंतर पुण्याच्या क्षितिजावर उदयास आली. गेल्या २०- २५ वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थी या संस्थांतून बाहेर पडले. त्यामुळे अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाचे माहेरघर अशी नवीन बिरुदावली पुण्याला प्राप्त झाली. हिंजवडी, खराडी अशा माहिती तंत्रज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पुणे शहराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला मोठ्या प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेकविध संस्था, कंपन्यांचा विस्तार झाला. या कंपन्यांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तितक्याच मोठ्या संख्येने माहिती तंत्रज्ञान, संगणक अभियांत्रिकी, आताच्या काळात विदा विज्ञानासारखे अभ्यासक्रम वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी विद्याशाखेच्या माध्यमातून महाविद्यालयात सुरू होऊन हजारोच्या संख्येने कुशल मनुष्यळ उद्याोगाच्या गरजा पुरवण्यासाठी उपलब्ध झाले. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वाहनोद्याोगसारख्या मोठ्या प्रमाणात रोजगार असलेल्या क्षेत्राची गरज पुणे शहर सहजपणे भागवत आहे. भविष्यामध्ये पुण्याचे स्वरूप कदाचित यापेक्षा वेगळे असू शकेल, कारण जगभरात बदलणारे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आणि नवनवीन उद्याोग समीकरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर कंपन्यांना भासणार आहे. पुण्यामधील अनेक शिक्षण संस्थांनी या बदलांना अनुरूप मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांबरोबर आणि वेगवेगळ्या जगभरातील ब्रॅन्डसबरोबर शैक्षणिक करार केले आहेत. त्यांच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण आणि नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी पुण्यातील बहुतांश विद्यापीठे सज्ज होत आहेत. शिक्षण, शिकवणी वर्ग, निवास व्यवस्था शहरात विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्याशिवाय पुण्याच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रगतिशील विचारसरणीचा निश्चितपणे भविष्यातील चांगला माणूस घडवण्यासाठी उपयोग होणार आहे, यात शंका नाही.
वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या संस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये सहकार क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण आणि उपक्रम राबविले जातात. भविष्यामध्ये या संस्थेला सहकार क्षेत्रासाठीचे देशातील पहिले सहकार विद्यापीठ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील पहिले सहकार विद्यापीठ असण्याचा मान पुण्यालाच लाभू शकतो. महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर राहिलेला आहे. त्यामुळे या क्षेत्राची भविष्यातील मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील काळात पुणे शहरामध्ये उपलब्ध होऊ शकतील. बालेवाडी येथे क्रीडा क्षेत्रासाठी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचे क्रीडा विद्यापीठात रुपांतर होत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या खेळांच्या प्रशिक्षणासह शास्त्रशुद्ध आणि संशोधनात्मक अभ्यास या विद्यापीठाच्या माध्यमातून होऊ शकतो. त्याचा फायदा पुणे, महाराष्ट्र, देशाच्या क्रीडा संस्कृतीसाठी नक्कीच होईल.
आजघडीला पुण्यामध्ये जवळपास २० स्वायत्त महाविद्यालये आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार येत्या महाविद्यालयाचे परिवर्तन पदवी देणाऱ्या विद्यापीठांमध्ये होणार आहे. आयएलएस महाविद्यालय, भांडारकर इन्स्टिट्यूट अशा नामवंत संस्था विद्यापीठांमध्ये रुपांतरित होणार आहेत. तसेच अनेक शैक्षणिक संस्था या खासगी विद्यापीठ होण्याच्या प्रक्रियेत आहेत. याचबरोबर ज्या शैक्षणिक संस्थांची शैक्षणिक संकुले पुणे शहर आणि परिसरामध्ये आहेत आणि एकापेक्षा अधिक विद्याशाखांची महाविद्यालये त्या संस्थेमार्फत चालवण्यात येतात अशा सर्व शैक्षणिक संकुलांचे परिवर्तन समूह विद्यापीठ या नव्या प्रकारच्या विद्यापीठात होणार आहे. मुंबईसारख्या शहरात मोठ्या जागेची चणचण असल्याने व्हर्टिकल युनिव्हर्सिटी अशी नवीन संकल्पना येऊ घातली आहे. त्यामध्ये जमिनीपेक्षा उपलब्ध असलेल्या इमारतीचे क्षेत्रफळ, विद्यार्थी संख्या अशा घटकांचा विचार करून येत्या काळात उत्तुंग विद्यापीठाची संकल्पना पुण्यातही अस्तित्वात येऊ शकेल. थोडक्यात पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन ते पाच वर्षांत विविध प्रकारच्या विद्यापीठांची संख्या जवळपास ५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. जगाच्या पाठीवरील कुठल्याही एका शहरात, जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या संस्थाकडून संचलित, वेगवेगळ्या वयाची, एका विषयापासून आणि एक विविध विषयांच्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना विकसित करून राबवणारी विद्यापीठ असणे जवळपास दुर्मीळ आहे. त्यामुळे विद्योचे माहेरघर असलेल्या या शहराचं महत्त्व जगाच्या इतिहासात आणि नकाशामध्ये कायम अधोरेखित होणार आहे.
या सगळ्या बदलांना सामोरं जाताना पारंपरिक शिक्षणाची आणि अभ्यासक्रमांची कास सोडण्याची आवश्यकता आहे. संशोधनात्मक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे आणि एक माणूस म्हणून त्यांना प्रगल्भ करणारे नवनवीन अभ्यासक्रम विद्यापीठांना तयार करावे लागतील आणि अभिनव पद्धतीने शिक्षण प्रक्रिया राबवून विद्यार्थी ज्ञान, अधिकाधिक व्यवहाराभिमुख आणि व्यवसायाभिमुख होईल, याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी विविध पातळ्यांवर होणार आहे. या धोरणाच्या विद्यार्थीकेंद्रित भूमिकेचा स्वीकार करताना विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी स्वायत्तता आणि सभोवताली असणारी अनेक विद्यापीठांची स्पर्धा याला तोंड देताना विद्यार्थीभिमुख प्रशासन, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम, लवचिक शिक्षणाची प्रक्रिया याचा संगम केला तरच सर्व अभ्यासक्रम, विद्यापीठ काळाच्या ओघात आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकतील. महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करून कदाचित तत्काळ फायदा होईल. परंतु, दूरगामी विचार करता जोपर्यंत शाश्वत धोरणांना अनुसरून अभ्यासक्रम तयार होत नाहीत, भविष्यातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षण प्रक्रिया विकसित केली नाही, तर उपलब्ध असलेले अन्य पर्याय विद्यार्थी स्वीकारतील. पहिल्या वर्षी प्रवेश घेतलेला विद्यार्थी शेवटच्या वर्षापर्यंत त्याच संस्थेत आणि अभ्यासक्रमात राहील याची खात्री निश्चितपणे राहणार नाही. भविष्यातील विद्यार्थी हा केवळ पदवीसाठी येणार नसून, त्याला शाश्वत आणि अद्यायावत ज्ञान मिळाले नाही, तर त्याला पर्यायी व्यवस्थेचा आधार घ्यावा लागेल, याची जाणीव ठेवूनच पुढील काळामध्ये शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल.
अंतराळ संशोधनापासून मनुष्याच्या आनंदी असण्याबाबत म्हणजेच हॅप्पीनेस इंडेक्स, या सर्वांचा सुंदर मिलाफ शिक्षण प्रक्रियेमध्ये करण्यास भरपूर वाव आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून न राहता भविष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य लक्षात घेऊन तसे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल. उदाहरणच सांगायचं झाल्यास शिवसृष्टीसारख्या संस्थेसह सामंजस्य करार करून एखाद्या विद्यापीठाला राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती देणारा वाटाड्या, गाईड शास्त्रीय आणि ऐतिहासिक माहिती संगम घडवून त्या गडकोटांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवू शकेल, असे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम निश्चितपणे मराठी मुलांना नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देतील. जगभरामध्ये अनेक ठिकाणी तज्ज्ञ मनुष्यबळाची मागणीनुसार आवश्यकता आहे. प्रत्येक विद्यापीठाने एखादा देश अथवा मुलभूत क्षमतेनुसार एखादे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात जगात कुठे मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्याचा अभ्यास करून, त्या देशातील मोठमोठ्या औद्याोगिक आस्थापनांबरोबर शैक्षणिक करार करून गरजेप्रमाणे आवश्यक असणारे अभ्यासक्रम राबवून मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, जगभरामध्ये लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले जाते. आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या सर्व वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कौशल्याचा विचार करून जगभरातल्या लॉजिस्टिक कंपनीशी करार करून अभ्यासक्रम तयार करून त्याद्वारे विशिष्ट प्रकारच्या औद्याोगिक समूहासाठी सक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे शक्य आहे. पारंपरिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक अभ्यासक्रम याच्या मागे न लागता जी विद्यापीठे अशा नवनवीन प्रयोगातून चांगल्या मनुष्यबळाची निर्मिती करेल तीच विद्यापीठे भविष्यात चांगला नावलौकिक निर्माण करू शकतील.
मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणारे आणखी एक क्षेत्र आहे, ते म्हणजे आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित सेवा देणारे क्षेत्र. पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट हॉस्पिटल्स तयार झाली असून, भारतामध्ये परवडणाऱ्या दरात वैद्याकीय सेवा घेण्यासाठी जगभरातून रुग्ण येतात. अशा सर्व येऊ घातलेल्या रुग्णावरील उपचार प्रक्रियेसाठी वैद्याकीय क्षेत्रातील डॉक्टर सोबतच इतर सर्व प्रकारच्या चाचण्या, आरोग्यनिगा यासाठी मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठीचे मनुष्यबळ वेगळ्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षित करावे लागणार आहे. ही दोन उदाहरणे लक्षात घेता काळानुरूप गरजा निर्माण होणारी आणि कुशल मनुष्यबळ आवश्यक असणारी अनेक क्षेत्रे समोर येतील.
आपल्याकडे मिळणाऱ्या या पदवीचा उपयोग आपण व्यवसायासाठी करत असतो. पण पदवी घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग पुढे तीस ते चाळीस वर्षे करावा लागतो. मात्र दरम्यानच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाची परिमाणे सातत्याने बदलत असतात. आज शिकलेले उद्या बदललेले असते. त्यामुळे व्यावसायिक पदवी आणि पदविका घेतल्यानंतर ज्ञानाचे अद्यायावतीकरण करण्यासाठी आपल्या सध्याच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची सक्षम व्यवस्था उपलब्ध नाही. सामान्य भाषेत सांगायचं झाल्यास अपस्किलिंग आणि रिस्किलिंग. अशा दोन्ही गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उभी करण्याची गरज आहे. प्रत्येक पाच वर्षानंतर त्या त्या विषयातलं बदललेलं ज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हींचा व्यावसायिक कौशल्यासाठी उपयोग आहे. त्यामुळे विविध विद्यापीठांच्या माध्यमातून पदवी घेतल्यानंतर दर पाच वर्षांनी विद्यार्थ्यांना अल्प कालावधीसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन माध्यमातून किंवा या दोन्हीच्या एकत्रित संगमातून त्यांचं ज्ञान पुढील पाच वर्षांसाठी अपग्रेड करणे आवश्यक आहे. अन्यथा सॉफ्टवेरसारख्या क्षेत्रामध्ये कालचं ज्ञान आज उपयोगी पडत नाही आणि आजचं ज्ञान उद्या कालबाह्य झालेलं असते. अशा सर्व नोकरदारांसाठी ठरावीक काळाने त्यांच्या नोकरीच्या जवळ अशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, जेणेकरून बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वत:ची क्षमता बदलल्यामुळे निर्माण होणारी असुरक्षितता टाळता येईल. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन शहरात केले जाते. मात्र, नव्या काळानुसार नव्या संशोधनाला चालना देण्यासाठी नव्या संशोधकांची गरजही निर्माण होणार आहे. अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने होणारे धोरणात्मक बदल यासाठी पुण्यातील भविष्यवेधी शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो.
आज विविध प्रकारची विद्यापीठे पुण्यात असली, तरी भाषा विद्यापीठ निर्माण होण्याची आवश्यकता आहे. जगामधील अनेक देशांमधील विविध आस्थापना शहरात उद्याोग-व्यवसाय करीत आहेत. त्यातील विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे जगामधील सर्व देशांतील कंपन्यांबरोबर व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. या सर्व आस्थापनांमध्ये संवादाचं महत्त्वाचं माध्यम आहे भाषा आणि त्या भाषेचा अभ्यास, विविध आवश्यकतेनुसार असणारे अभ्यासक्रम निश्चितपणे एक विशेष विषय म्हणून करता येतील. तसेच मोडी लिपीमधली हजारो कागदपत्रे लिप्यंतराच्या प्रतीक्षेत आहेत. हा ठेवा तज्ज्ञांनी जगासमोर आणण्याची गरज आहे. त्यामुळे भाषेशी संबंधित अभ्यासक्रम करताना असलेले वेगवेगळ्या लिपींमधील साहित्य, मराठी अथवा इंग्रजी भाषेमध्ये रुपांतरित करणे ही भविष्याची गरज आहे. सरकारच्या धोरणानुसार सर्व अभ्यासक्रम आणि सर्व संदर्भ पुस्तकेही स्थानिक भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी तज्ज्ञांची गरज निर्माण होणार आहे.
आज विद्यापीठे झालेली पूर्वीची महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (तत्कालीन पुणे विद्यापीठ) भाग होती. शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेची जाणीव ठेवून एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने काही अभ्यासक्रम, काही विषयांचे आदानप्रदान केल्यास शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्षितिज विस्तारण्यासाठी, त्यांचे भविष्य घडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होणार आहे.
सरतेशेवटी सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आवश्यक ते परिवर्तन घडवून आणून त्यांचे जीवनमान बदलून टाकण्याची ताकद या शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या बाहेर जाऊन त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे त्यांना शिक्षण घेण्याची क्षमता वेगवेगळ्या चांगल्या योजनांच्या माध्यमातून निर्माण करता येईल. हेच विद्यार्थी भविष्यात पुण्याचा नावलौकिक जगभरात पोचवून इथल्या शिक्षण व्यवस्थेला जगमान्यता मिळवून देतील, असा विश्वास वाटतो.
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू आहेत)
pckalkar@gmail. com