पुणे : पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळेच देशाचे स्वरूप बदलत आहे. मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळेच व्यवस्थेचे परिवर्तन झाले आहे. संस्कृतीची जोपासना, विविध सेवा प्रणालींचे आधुनिकीकरण, मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या विकासकामांतून मोदींनी देशात केलेले परिवर्तन स्पष्ट झाले आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे’ या विषयावर डॉ. निर्मला सीतारामन यांचे व्याख्यान बुधवारी आयोजित करण्यात आले होते.

  संस्कृतीची जोपासना, विविध सेवांचे आधुनिकीकरण मोदींनी केले आहे. ऑनलाइन किंवा डिजिटल व्यवहार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल की नाही, अशी शंका व्यक्त होत असताना देश डिजिटल व्यवहारांमध्ये सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शासकीय व्यवस्थेला गती देण्याबरोबरच आर्थिक व्यवहारात संगणकीय प्रणालींचा वापर वाढविण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भूकंपांमुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्याला प्रगतिपथावर आणत पुन्हा उभारी घेऊ शकता, ही बाब मोदींनी लोकांपर्यंत पोहोचविली आहे. लोकांचा विश्वास, योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात आलेले यश, समर्पित विकासकामे, योजनांची तातडीने अंमलबाजवणी, योजनांतील नावीन्यता, स्वच्छ, पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार हीच मोदींच्या कामाची वैशिष्टय़े आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले.

Story img Loader