पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) नियतकालिक मूल्यांकनाअंतर्गत २ ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन २ ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ४ ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियतकालिक मूल्यांकनाअंतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळेतील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा दहा माध्यमांत घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, उत्तरसूची पुरवल्या जाणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ४ एप्रिल रोजी तिसरी आणि चौथीची प्रथम भाषा परीक्षा सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत, ५ एप्रिल रोजी पाचवी आणि सहावीची गणित विषयाची परीक्षा सकाळी आठ ते पावणेदहा या वेळेत, ६ एप्रिल रोजी सातवी, आठवीची इंग्रजी विषयाची परीक्षा सकाळी आठ ते दहा या वेळेत घेतली जाणार आहे. तिसरी, चौथी, सहावी, सातवी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन २च्या प्रश्नपत्रिका वर्ग, विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे, वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील.  दिनांक, विषय आणि इतर बाबतीत बदल करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मावळमधून कामगारांच्या प्रतिनिधीला संधी द्या, भाजपशी संलग्न राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी

पाचवी, आठवीच्या दोन स्वतंत्र परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी  शिक्षकांनी शाळा स्तरावर  प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा, निकालाची कार्यवाही करावी. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर दिलेल्या नमून्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार करून  वार्षिक परीक्षा घ्यावी. त्यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार नाहीत. पाचवी आणि आठवी या वर्गाना नियतकालिक मूल्यांकनातील तीन विषयांची संकलित मूल्यमापन २, तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. शासनामार्फत घेण्यात येणारी नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ लागू  नसलेल्या शाळांनी केवळ सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन करायचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in the examination schedule conducted by the state council of educational research and training pune print news ccp 14 amy