राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे संशोधन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिन्मय पाटणकर, लोकसत्ता

पुणे : चांगल्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मायक्रोबायोममध्ये वाढत्या वयानुसार बदल होत असल्याचे राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेने (एनसीसीएस) के लेल्या अभ्यासातून आढळून आले आहे. भारतातील एकत्र कु टुंबातील सदस्यांच्या वाढत्या वयानुसार बदलणाऱ्या मायक्रोबायोममुळे रोगांना कारण ठरू शकणाऱ्या जीवाणूंचे शरीरातील प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

एनसीसीएसने केलेल्या या अभ्यासाचा शोधनिबंध सायंटिफिक रिपोर्ट या संशोधन पत्रिके त प्रसिद्ध  झाला आहे. डॉ. योगेश शौचे यांच्या मार्गदर्शनाखाली दीप्तराज चौधरी, धीरज धोत्रे, धीरज अगरवाल, अक्षय गायके , देविका भालेराव, परमेश्वर जाधव, दत्तात्रय मोंगड, हिमांगी लुब्री, विलास सिनकर, उल्हास पाटील, संदीप साळवी, आशिष बावडेकर, संजय जुवेकर यांनी या संशोधनात सहभाग घेतला.  डॉ. शौचे म्हणाले, की शरीरातील ‘गट मायक्रोबायोम’ बऱ्याच घटकांमुळे बदलतो. त्यात आहारपद्धती, वय असे विविध घटक कारणीभूत असतात.  वढू येथील सहा एकत्र कुटुंबातील एकूण ६४ सदस्यांच्या तोंड, त्वचा आणि पोटातील त्वचेतील मायक्रोबायोमची चाचणी करण्यात आली. या चाचणीतून वय आणि पिढीगणीक बदल या घटकांचा किती परिणाम होतो हे दिसून आले.  वाढत्या वयानुसार शरीरातील चांगल्या आरोग्याशी निगडित असलेले काही जीवाणूंचे प्रमाण कमी होत जाते. रोगांना कारणीभूत जीवाणूंचे प्रमाण वाढू लागते. विभक्त कुटुंबे विचारात घेतल्यास त्यांची आहारपद्धती, जीवनशैली वेगळी असल्याने त्यांच्यातील मायक्रोबायोममधील बदलासाठी विविध घटक कारणीभूत असू शकतात. जगभरातील अनेक संशोधनांमध्येही असाच कल आहे.  एकत्र कुटुंबातील सदस्यांचा मायक्रोबायोम बदलण्यात वय हा घटक जास्त कारणीभूत असू शकतो हे या संशोधनातून अधोरेखित होते.

व्यापक अभ्यासाचे नियोजन

वढू येथे के लेल्या संशोधनानंतर आता या संदर्भात अधिक मोठय़ा पातळीवर संशोधन करण्याचे नियोजन आहे. देशभरातील लोकांचे मायक्रोबायोम घेऊन त्याचा अभ्यास के ल्यास अधिक तपशीलवार निष्कर्ष समोर येऊ शकतील, असे डॉ. शौचे यांनी सांगितले.

मायक्रोबायोम म्हणजे काय?

मानवी शरीरामध्ये असलेल्या जीवाणूंना मायक्रोबायोम असे म्हटले जाते. मानवी स्वभाव, आरोग्य, एकूण आयुर्मान यावर मायक्रोबायोम परिणाम करतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in the microbiome with increasing age zws