लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.

Funeral in light of mobile, Funeral Naigaon Koliwada,
वसई : मोबाइलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, नायगाव कोळीवाड्यातील स्मशानभूमीची दुरवस्था
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
On the occasion of Dussehra more than three and a half thousand vehicles have been registered in the transport department vasai news
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल
Change in traffic route in Ramkund area on the occasion of Dussehra
नाशिक : दसऱ्यानिमित्त रामकुंड परिसरात वाहतूक मार्गात बदल
devotees Navratri festival Yavatmal, Navratri festival,
Navratri 2024 : दुर्गोत्सव नव्हे लोकोत्सव! यवतमाळचा नवरात्रोत्सव बघण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी
pune traffic route changes
Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल
Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
Increase in police presence in Mumbai eyes on religious places
मुंबईतील बंदोबस्तात वाढ, धार्मिक स्थळांवर करडी नजर

नवरात्रोत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. रविवारपासून (१५ ऑक्टोबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु राहणार राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. सकाळ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांनासाठी बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभूजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-हलगीचा कडकडाट, संबळाचा निनाद! आई राजा उदो-उदोच्या जयकारात घटस्थापना

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत. सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येणार आहे.

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. नेहरु रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरु रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरु रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.