पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१ मे)शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागात मोदी यांचे विविध कार्यक्रम आहेत. मध्यभागात शाळा, तसेच व्यापारी पेठ आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांचे आगमन मंगळवारी सकाळी शहरात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोदी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितासाठी आहे. शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन मोदी करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यभागातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>दहशतवाद्यांच्या सूत्रधाराचा एटीएसकडून शोध

हेही वाचा >>>पुणे : लोहियानगर परिसरात अनोळखी तरुणाचा खून

मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत प्रमुख मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल करण्यात आलेले रस्ते पुढीलप्रमाणे- आचार्य आनंदऋषीजी चौक (पुणे विद्यापीठ चौक), वेधशाळा चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, शिवाजी रस्ता, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक चौक (अलका चित्रपटगृह), टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, संगमवाडी रस्ता, येरवडा सादलबाबा चाैक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in traffic in pune on the occasion of prime minister narendra modi visit pune print news rbk 25 amy
Show comments