येरवडा येथील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात उपप्राचार्याच्या विरोधात गुरुवारी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. डांबून ठेवणे, विनयभंग करणे, बलात्काराचा प्रयत्न, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार आदी आरोपांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
इज्यू फ्रान्सीस फलकाऊ (वय ६१, रा. येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. २ जानेवारीला ही घटना घडली होती. फलकाऊ हा ही मुलगी शिकत असलेल्या शाळेत उपप्राचार्य होता. २ जानेवारीला शाळा सुटल्यानंतर संबंधित मुलीला त्याने भेटण्यासाठी बोलविले. मुलगी कार्यालयात आल्यानंतर दरवाजा बंद करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करून ही मुलगी पळून गेली. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये एकूण ११ साक्षीदार आहेत.

Story img Loader