पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटरमिजिएट परीक्षा आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. अंतिम निकालात नवी दिल्लीच्या हर्ष चौधरीने देशात पहिला क्रमांक मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीएआयने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली होती. त्यातील अंतिम परीक्षेत ६५ हजार २०१ विद्यार्थ्यांनी ग्रुप एकची परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ९६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णाची टक्केवारी २१.३९ आहे. ग्रुप दोनची परीक्षा दिलेल्या ६४ हजार ७७५ विद्यार्थ्यांपैकी १८.६१ टक्के, म्हणजे १२ हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार २४२ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णाची टक्केवारी ११.०९ आहे. या परीक्षेत दिल्लीच्या हर्ष चौधरीने देशात पहिला क्रमांक पटकावला. तर इंदूरची शिखा जैन आणि मंगलोरची रामेश्वरी यांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळवला.

हेही वाचा – पुणे : शस्त्रक्रिया करताना गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी, खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

इंटरमीजिएट परीक्षेतील ग्रुपचा निकाल २१.१९ टक्के लागला. दुसऱ्या ग्रुपचा निकाल २४.४४ टक्के, तर दोन्ही ग्रुपचा निकाल १.२७२ टक्के इतका लागला आहे. हरियाणाच्या दीक्षा गोयलने देशात पहिला, मुंबईच्या तुलिका जालनने द्वितीय, जयपूरच्या सक्षम जैनने तृतीय क्रमांक मिळवला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chartered accountant course final exam result declared new delhi harsh chaudhary first in the country pune print news ccp 14 ssb