पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अखेर काही महिन्यांनंतर पुन्हा स्वस्तात पाणी मिळू लागले आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली आहेत. त्यातून प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी पाच रुपये लीटर दराने मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे रेल्वे स्थानकावर सुमारे वर्षभरापूर्वी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दोन वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही यंत्रे बंद पडली होती. आता नव्याने पुन्हा यंत्र बसविण्यात आली आहेत. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर या सुविधेचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना पाच रुपयांत एक लीटर पाणी मिळू लागले आहे.

हेही वाचा – पुणे : नकटी बोलल्याने सासू-सुनेत वाद; सुनेने केला सासूच्या हातावर सुरीने वार

रेल्वे स्थानकावरील वॉटर व्हेंडिंग यंत्रे बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे नळ होते. परंतु, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. याचबरोबर या नळांच्या भोवतालीही अस्वच्छता पसरली होती. यामुळे अनेक प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत होत्या. रेल्वे प्रशासनाने स्वस्तात पाणी देण्याची सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.

हेही वाचा – दिवाळीनिमित्त गावी जाताय? एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन जाणून घ्या…

पुणे रेल्वे स्थानकावरील वॉटर व्हेंडिंग यंत्रे बंद असल्याबाबत सातत्याने आयआरसीटीसीकडे पाठपुरावा केला होता. तसेच रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला होता. अखेर रेल्वेने या बाबत कार्यवाही करून नवी यंत्रे कार्यान्वित केली. – निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheap water now at pune railway station a liter for five rupees pune print news stj 05 ssb
Show comments