पाच लाख पौंड रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून साडेसात लाख रुपये रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश महादेव बोरुडे (वय ४२, रा. चऱ्होली, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून नेहा नावाच्या महिलेसह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरुडे यांच्याशी आरोपींनी ईमेल आणि फोन करून संपर्क साधला. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. बोरुडे यांना कोका-कोला मोबाईलच्या नावाने पाच लाख पौंडाची लॉटरी लागल्याचे सांगितले. ही रक्कम मिळविण्यासाठी त्यांना बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या खात्यावर साडे सात लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, पैसे भरल्यानंतर बोरुडे यांचा आरोपींशी संपर्क झाला नाही. तसेच, लॉटरीची रक्कमही न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी भरलेल्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आहेत. ही खाती कोणाची आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक काटे अधिक तपास करत आहेत.
पाच लाख पौंडाची लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक
पाच लाख पौंड रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून साडेसात लाख रुपये रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 04-08-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating 0f 7 50 lacks by fake lottery