गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ११ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>>मनसेची भिस्त ‘राज’दूतांवर ! ; हजार मतदारांमागे मनसेचा एक राजदूत, निवडणुकीसाठी मनसेची नवी रणनीती
मिलिंद बाळासाहेब गाढवे (रा. सांगली), अजय जगदेव इंगळे (रा. निगडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका संगणक अभियंत्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विमाननगर भागात राहायला आहेत. आरोपी इंगळे याच्यामार्फत त्यांची गाढवे याची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्या वेळी गाढवे याने संगणक अभियंत्यास गुंतणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. संगणक अभियंत्याकडून गाढवे आणि इंगळे यांनी ११ लाख ६२ हजार रुपये गुंतवले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे अर्ज दिला. तक्रार अर्जाची शहानिशा करुन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>>पुणे : महापालिकेकडून वर्तुळाकार मार्गासाठी २११ कोटी ; पूर्वगणन समितीची मान्यता
मिलिंद गाढवे विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे
आरोपी मिलिंद गाढवे याने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला आहे. त्याच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग, भारती विद्यापीठ तसेच विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गाढवेच्या विरोधात सांगली जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून तेथील आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू आहे.