पुणे : पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने दोन तरुणींची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष चंद्रकांत तावडे (रा. कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. तरुणीची परिचितामार्फत आरोपी तावडेशी ओळख झाली होती. तावडेने तरुणीला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते.
हेही वाचा – डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
तक्रारदार तरुणी आणि तिच्या मैत्रिणीकडून तावडेने वेळोवेळी १५ लाख रुपये उकळले. बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केली. तरुणीने तावडेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तावडेविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.