मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ बाह्य वळणावर टंँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरच्या धडकेने तब्बल ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाले असून या सर्व जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आरोपी चालक मनीलाल यादव (वय २४ मूळचा रा.उत्तर प्रदेश) येथील असून त्याच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा- Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झालेच नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा, पोलीस म्हणाले “चालकाने…”

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
pune vehicle vandalized news in marathi
Video : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधत असताना म्हणाल्या की, कात्रज बोगदा ते नवले ब्रिज पर्यंत क्रोनिक पॉईंट झाले आहेत. तसेच रस्त्याला प्रचंड उतार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त आणि संबधित अधिकारी वर्गा सोबत आज बैठक होणार आहेत.त्यामध्ये या रस्त्यावरील अपघात बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नोट करून देण्यात येणार आहे. या रस्त्यावर झिरोवर अपघात आले पाहिजे. यावर विशेष उपाय योजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरी पूल ते नवले ब्रीज दरम्यानची वाहतुक सुरळीत करण्याच्या दृष्टीने येत्या काळात स्थानिक आणि हायवे वाहतूक स्वतंत्र करण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले ब्रीज दरम्यान असलेल्या रस्त्यावरील उतार कमी करण्याच्या दृष्टीने एक समांतर रस्ता करण्याच नियोजन आहे. त्याचा डिपीआर तयार करण्यात आला आहे.तसेच दरी पुलाजवळ चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होणार आहे.अशी माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम यांनी दिली.

हेही वाचा- पुण्यात नवले पूल परिसरात पुन्हा दोन अपघात,दुचाकीस्वाराचा मृत्यू; सातजण जखमी

खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर,पुणे महापालिकेचे अतिरिक्त कुणाल खेमणार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक आणि राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय कुमार मगर यांच्यासह अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली.

यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले की,नवले ब्रिज येथे तांदुळाने भरलेल्या ट्रकने काल रात्री अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. त्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.तसेच उतारावरून येताना ट्रक चालकाने गाडी न्यूट्रल केली.त्यामुळे गाडीचा अधिक वेग निर्माण झाल्याने, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे.आजपर्यंत अपघाताच्या घटना लक्षात घेता, बाहेरून येणार्‍या वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळविण्या च्या दृष्टीने विशेष उपाय योजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार म्हणाले की, नवले ब्रिज येथील अपघाताची घटना लक्षात घेऊन सर्विस रोड वरील अतिक्रमण अधीक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी येत आहे.यामुळे अपघाताच्या घटना देखील होत आहे.ही बाब समोर आली असून त्यामुळे सर्विस रोड वरील अतिक्रमण हलविण्यात येणार आहे.हायवे वर अधिक वाहतूक कशा प्रकारे सुरळीत होईल.त्याबाबत अधिकारी वर्गाला सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- थंडीच्या कडाक्यात वाढ; हंगामात प्रथमच तापमान १० अंशांखाली

दरी पूल ते नवले ब्रीज दरम्यान अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या दरम्यान दिशादर्शक फलक लावण्यात यावे. स्पिड कमी होण्याच्या दृष्टीने जाड पट्ट्या आखण्यात याव्यात या मागणी करीता अनेक वेळा आम्ही आंदोलन केली आहेत.आता तरी प्रशासनाने दरी पूल ते नवले ब्रीज दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे यांची संख्या वाढवावी आणि दरी पूल येथे चेक पोस्ट उभारण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यामुळे निश्चित अपघात होतील असे मत स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.

अपघातामधील जखमींची नावे खालीलप्रमाणे

राहुल भाऊराव जाधव रा.वारजे,शुभम विलास डांबळे, तुषार बाळासाहेब जाधव,आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग, साहू जुनेल रा.कोंढवा,ऑस्कर लोबो रा. कोंढवा,मधुरा संतोष कारखानीस वय ४२ वर्ष रा. वनाज,चित्रांक संतोष कारखानीस वय ८ वर्ष, तनीषा संतोष कारखानीस वय १६ वर्ष, विदुला राहुल उतेकर वय ४५ वर्ष,अनघा अजित पभुले वय ५१ वर्ष रा. वडगाव, अनिता अरुण चौधरी वय ५४ वर्ष रा. राहटणी चौक, वरील १३ जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader