किरकोळ विक्री (रीटेल) क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध आणि केंद्राच्या नव्या ‘फार्मा-पॉलिसी’ च्या विरोधात केमिस्ट असोसिएशनच्या औषधविक्रेत्यांनी शुक्रवारी (१० मे) एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याने या दिवशी औषध दुकाने बंद राहणार आहेत.
असेसिएशनच्या पुणे शाखेचे सचिव विजय चंगेडिया म्हणाले, ‘‘नवीन ‘फार्मा पॉलिसी’मध्ये औषधविक्रेत्यांचा नफा कमी होण्याची शक्यता असल्याने तो आता आहे तेवढाच राहावा, ही प्रमुख मागणी आहे. परकीय गुंतवणूक उत्पादन किंवा संशोधनापुरती असावी. औषध दुकानात फार्मासिस्ट ठेवावा, या अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, त्यासाठी औषध विक्रेत्यांना थोडा अधिक अवधी मिळणे आवश्यक आहे. औषधनिर्मिती कायद्यात २००८ साली काही सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांची अंमलबजावणी करताना औषध विक्रेत्यांची चूक नसल्यास त्यांच्यावर हकनाक कारवाई नको. औषध उत्पादक कंपनीच्या चुकीबद्दल वितरक व विक्रेत्यांना जबाबदार धरले जाऊ नये.’’
परकीय गुंतवणूक उत्पादन किंवा संशोधनापुरती असावी.‘औषध दुकानात फार्मासिस्ट हवाच’, या अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र ही मोहिम राबवण्यासाठी औषध विक्रेत्यांना थोडा अधिक अवधी मिळणे आवश्यक आहे. औषधनिर्मिती कायद्यात २००८ साली काही सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांची अंमलबजावणी करताना औषध विक्रेत्यांची चूक नसल्यास त्यांच्यावर हकनाक कारवाई नको अशी आमची भूमिका आहे. औषध उत्पादक कंपनीच्या चुकीबद्दल वितरक व विक्रेत्यांना जबाबदार धरले जाऊ नये.
बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी ग्राहकांना काही विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी संघटनेतर्फे खालील दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.
अनिल बेलकर (सदाशिव पेठ)- ९८२२४०४९६०, संतोष खिंवसरा (पिंपरी- चिंचवड)- ९८६०७१८१८५, विजय चंगेडिया (हडपसर)- ९८२२०८९५८९, रोहित करपे (सदाशिव पेठ)- ९८२२१९२५५८, हरिभाई साँवला (सदाशिव पेठ)- ९८२३१६६१०५, सुरेश बाफना (वडगाव- मावळ)- ९८९०१८८९०९, संजय शहा (सिंहगड रस्ता)- ९८५०८२८९८९, राहुल दर्डा (सदाशिव पेठ)- ९९२३९४००००, प्रदीप कावेडिया (सदाशिव पेठ)- ९८२२०१००३५, राहुल देशपांडे (भोर)- ९८२२५२५३२५, भारत मोकाशी (बारामती)- ९९२१४१२००१

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemist associations nationwide strike today