सिंधू सेवा दलातर्फे सिंधी समाजाचे आराध्यदैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (११ एप्रिल) चेटी चंड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सिंधी नववर्षांनिमित्त आयोजित समाज बांधवांच्या स्नेहमेळाव्यामध्ये पूजा, लोकनृत्य, काजल चंदीरमानी आणि सहकारी यांचा सिंधी गीतांचा कार्यक्रम, प्रकाश भगत यांच्या स्वरातील भक्तिरचना असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. क्वार्टर गेट परिसरातील टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान येथे सायंकाळी सहा वाजता हा स्नेहमेळावा होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष विजय दासवानी आणि सचिव दीपक वाधवानी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. उत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (१० एप्रिल) भवानी पेठेतील पदमजी पोलीस चौकीजवळील संस्थेच्या कार्यालयापासून सायंकाळी साडेचार वाजता साई झुलेलाल यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाशी तिची सांगता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheti chand festival on 11th april
Show comments