पुणे : राज्यात गाजत असेल्या मराठा आरक्षण या विषयावर राज्यातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. येत्या सोमवारी (१८ डिसेंबर) रोजी दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने त्यांनी हा पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र पाठविले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले होते. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची दिल्ली येथे त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होणार असून या बैठकीस शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे खासदार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
Story img Loader