पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतही राज्यातील गडकोटांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सगळे राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची नावे घेतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या जतन, संवर्धनासाठी कोणी काहीच केले नाही, अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी व्यक्त केली. सरकारची किल्ल्यांची दत्तक योजना फक्त पर्यटन वाढवण्यासाठी आहे. मात्र गड-किल्ल्यांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन-संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बायफोकल्स पब्लिकेशन्सतर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरज गुरव लिखित ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, वनविभागाचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील, राज्य उत्पादन शुल्क, पुणेचे अधीक्षक चरणसिंह राजपूत, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, दुर्ग अभ्यासक सचिन जोशी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – ज्येष्ठ साहित्यिक माधव पोतदार यांचे निधन

रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मात्र, नोकरशाहीच्या जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – पुणे : गटारात पडलेल्या वासराची अग्निशमन दलाकडून सुटका

राज्य सरकारतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा सत्कार, सन्मान केला जातो. परंतु, पदरमोड करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी एकही पुरस्कार किंवा गौरव नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने तरी गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार व्हावा, असे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के घाणेकर यांनी सांगितले.