छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी गुरुवारी (८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहर बंदचे आवाहन केले आहे. या आंदोलनात छत्रपती युवराज संभाजीराजे सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना १५ दिवसांत निघेल; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलक सकाळी दहापासून ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत पिंपरी चौकात धरणे आंदोलन करणार आहेत. शहरातील विविध संस्थांचे कार्यकर्ते रॅलीद्वारे या ठिकाणी जमा होणार आहेत. दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे आंदोलनात सहभागी होणार असून आंदोलकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक मारुती भापकर यांनी पत्रकारांना दिली.