राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल स्पष्टपणे विधान केलं. या अगोदर राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत वक्तव्य केलं होत, ज्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PHOTOS : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहूत ; शिळामंदिराचे घेतले दर्शन

“कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत.” असं खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोर सांगितलं.

महाराष्ट्र संतांची भूमी, जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत- राज्यपाल कोश्यारी

“राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल.”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार कोल्हे यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण हे जाहीरपणे सांगितलं. पुण्याच्या खेडमध्ये हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

पाहा व्हिडीओ –

महात्मा गांधी यांनींच स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं म्हणणं हे एकतर्फी राहील –

यानंतर बोलताना राज्यपालांनी खासदार कोल्हेंच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं म्हणणं हे एकतर्फी राहील. कारण दुसरीकडे हुतात्मा राजगुरूंप्रमाणे अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिल आहे, हे विसरून चालणार नाही. याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.

हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाच्या निधीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन –

तर, राज्यातील सध्याच सरकार हे राज्यपालांच्या ऐकण्यातलं आहे. त्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी मदत करा, असे आदेश ते या सरकारला देतील. अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंनी केली. याला प्रत्त्युतर देताना तुमचे नामदार हे कामदार आहेत. मात्र फक्त नामाचा तर मी आहे, राज्यपालांकडे तर काहीच नसतं. असं मिश्कीलपणे नमूद केलं, पण पुढे बोलताना स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असं आश्वासनही दिलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharajs real gurus are shahaji raje and rajmata jijau amol kolhe msr 87 kjp