पुणे : छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना गावातच सोसायट्यांमार्फत शून्य टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. तसेच, शेतकऱ्यांचा मालही सोसायट्या खरेदी करून त्याची विक्री करतात, अशी योजना महाराष्ट्रात राबवल्यास येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नुकतीच शेतकऱ्यांच्या गोदाम पावतीवर केवळ ४ तासांत कर्ज देण्याच्या योजनेअंतर्गत १०० कोटींचा गाठलेला टप्पा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आखण्यात आलेली शून्य टक्क्यांची योजना आणि शेतकऱ्यांविषयीच्या योजनांची माहिती देण्यासाठी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी राज्यपालांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. या वेळी राज्यपालांनी अनेक मुद्दयांवर सविस्तर चर्चा करीत राज्य बँकेला काही सूचना केल्या.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

आणखी वाचा-पिंपरी महापालिका आयुक्तांकडून आकसातून कारवाई; उपायुक्त स्मिता झगडे यांचे स्पष्टीकरण

राज्यपाल बैस हे छत्तीससगड राज्यातील आहेत. छत्तीसगडमधील अनेक चांगल्या योजना महाराष्ट्रात राबविण्याची सूचना त्यांनी केल्या. छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्रातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे आवश्यक कर्जपुरवठा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी रायपूर येथील जिल्हा बँकेच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून तेथील योजनांची माहिती राज्य बँकेस देण्याच्या सूचना करून अनास्कर यांना छत्तीसगड भेटीचे निमंत्रण दिले. या वेळी अनास्कर यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.

केरळच्या सहकारमंत्र्यांची बँकेला भेट

केरळ सरकारने देशात प्रथमच राज्यातील १४ जिल्हा बँकांचे विलीनीकरण स्वतःच्या राज्य बँकेत करून देश पातळीवरील सध्याच्या सहकारी पतसंरचनेच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये बदल करून ती द्विस्तरीय करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केरळचे सहकार मंत्री व्ही. एन. वासवान आणि तेथील दहा आमदारांनी राज्य बँकेला नुकतीच भेट देऊन चर्चा केली.